अहंकार..
एक अस्थावस्थ नजर स्वतःलाच शोधत असते..
खितपत पडलेल्या निर्माल्यतेच्या डोहातून आता ती बाहेर पडू पाहते..
कधी उजेडाची सवय होती कधी किरणांमुळेच त्रस्थता आली..
कधी अंधूकतेची भिती होती कधी अंधाराचीच सवय झाली..
समीकरणे जुळवायचा अट्टहास काहीसा नडला होता..
रस्ता माहिती असूनसुद्धा भरकटला होता..
बाहेरच्या जगाची पर्वा कधीच नव्हती स्वत: मधेच एक जग होतं..
सहज डावललेल्या गोष्टींची उणीव कधीच नव्हती..
जाणीव तर तेव्हा झाली जेव्हा "काय मिळवलं?" हा प्रश्न समोर आला.. एव्हाना गमावलेल्या गोष्टींची यादी काहीशी मोठी होती..
मग वाटलं उगाच डावलल्या गोष्टी.. उगाच केले अट्टहास.. उगाच उच्चारले शब्द..(कधीच परत न घेता येणारे )
"मी काहीही करू शकते!!" आता हा आत्मविश्वास होता की भलताच अहंकार हे तसं पुसटच आहे..
आत्मविश्वास असेल तर चांगलंच..
पण परिणामांची भाषा राहून राहून हा अहंकार असलेल्याची टोचणी देतायत.. हुश्श..!! तसं असेल तर अहंकार खरंच खूप वाईट कधी तो माणसातील भावनांना गिळंकृत करेल काही सांगता येत नाही!
-ऋतुजा गुरव
Comments
Post a Comment