एक शिकवण अशीही..
इलेक्शनच ट्रेनिंग उरकून रूमवर जायला निघाले होते. खूप जास्त भूक लागलेली काहीतरी खाऊन जाऊ विचार केला पण चांगलं असं आजूबाजूला काही दिसलंच नाही. मग म्हंटलं रूमलाच जाऊन काहीतरी खाऊ. पाहिलं तर २०-२५ मि. चा रस्ता. आधी बससाठी थांबले.. नंतर पाहिलं की बसला खूप गर्दी होती मग रिक्षाकडे वळाले तेव्हा एक रिक्षावाला थांबलेला दिसला त्यांनी विचारले कुठे जायचं मी पत्ता सांगितला.. रिक्षावाला - या बसा.. मी- किती घेणार? रिक्षावाला- किती द्याल ? मी- 30 रुपये घेतात, मी तेवढेच देईन.. रिक्षावाला - एवढ्या मध्ये नाही होणार. मी- ठीक आहे राहू दे..मी दुसरी रिक्षा बघते. रिक्षावाला- ( काहीसे नाराज होऊन)..बसा..तेव्हा ते स्वतः सोबत काहीतरी पुटपुटताना दिसले..मी लक्ष दिले नाही..वय असेल ७०-७२ च्या आसपास..हात थरथरणारे..शरीर एकदम थकलेलं.. चष्मा धाग्याने बांधलेला.. नंतर पुन्हा थोडा वेळ ते पैशाचा विचार करून थोडे जास्ती देता का विचारपूस करत होते तोवर त्यांना आणखी एक पॅसेंजर मिळाला मग आम्हा दोन प्रवाशांना घेऊन रिक्षा निघाली.. बरं झालं म्हंटलं आजोबांचा तोटा पण होणार नाही.. आपण पण वेळेत पोहचू.. तेवढ्यात मला समजलं की ...