" जगा आणि जगू द्या"


रस्ते सुनसान झाले..
शाळा ओसाड पडल्या..
लगभगीत गुंतलेलं शहर आता काहीसं सामसुम दिसतंय.. 
रोजच आयुष्यामागे धावणारी गर्दी आज चार भिंतीमध्ये विसावली..
कोणी परदेशी दिसल्यानंतर selfie साठी जमणारे आता जगण्यासाठी त्यांच्यापासून लांब राहतायत.. इथे आता काहीसा प्रांतवाद दिसतोय असं म्हणायला काही हरकत नाही..
कामासाठी शहरात राहिलेल्या लेकरामध्ये गावाकडच्या म्हातारीचा जीव अडकलाय..
शाळेत असताना मास्तरांनी लावलेली हात धुवायची सवय तशी लुप्तच झाली होती, वाटलं नव्हतं कधी college मध्ये येऊन पुन्हा तिची आठवण येईल..
नमस्कार करून भेटायची आपली संस्कृती Shake-hand च्या जमान्यात तशी हरवतच होती पण लोकांना आज पुन्हा तिची आठवण झालीय म्हणे..  
आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण थांबलीय.. 
आता देशादेशांमध्ये एकमेकाला कमी ठरवण्याची स्पर्धा बाजूला राहीलीय वाटतं.. सगळे मिळून एकाच संकटाचा सामना करतायत म्हणे..
माणसाला पृथ्वीवरचा सगळ्यात हुशार आणि प्रगल्भ जीव म्हणतात खरं
पण एका सुक्ष्म विषाणूने त्याला सळो की पळो केलंय म्हणे..
रोजच्या त्या मनाला धास्तावून टाकणार्या बातम्या आता ऐकवत नाहीत..
मजूरांची होणारी ती फरफट आता बघवत नाही..
एकीकडे या रोगराईमुळे मृत्यूमुखी पडणारे तर दुसरीकडे उपासमारीमुळे जीवाला मुकणारे आणि जर राहिलंच काही तर घराकडची आस लावून वणवण करणार्या पावलांचे रोजचे अपघाती मृत्यू काळजाला छेद करून जातात..
देशसेवेसाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकणार्या डॉक्टर्स,नर्सेस, आणि पोलिसांचा सार्थ अभिमान वाटतो पण त्यांना होत असलेली हानी बघून खूप वाईट वाटतं..
हे सगळं काही असह्य आहे आणि आपण मात्र हतबल!
ना कोणी गरीब सोडला ना कोणी श्रीमंत..
ना जात पाहिली गेली ना धर्म..
सृष्टीला सगळे जीव सारखेच आहेत हे बहुधा आपण विसरलो होतो आणि तिने हे खरंच खूप आक्रमकतेने जाणवून दिलं..
यातून शिकण्यासारखं एकच इतर प्रत्येक सजीवाला जगण्याचा तितकाच जगण्याचा अधिकार आहे जितका मानवाला त्यामुळे आपण आपल्या वर्तुळात सुखी राहिलेलं बरं..
उगाच अहंकार करून माणसाने मुक्या प्राणीमात्रांचा छळ केला आज त्याचंच फळ म्हणून एकटा कोरोना जगावर भारी पडला आहे पण कोरोना नवीन इतिहास लिहितोय हे नक्की!
            एकूणच आपण आता तरी शिकलं पाहिजे, निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत.. फक्त कोरोना नाही महापूर,त्सूनामी,वणवे अशा अनेक संकटातून आपण तरलो आहे.. यापेक्षाही भयंकर भविष्य असू शकतं आपण आत्ताच सावध झालेलं‌ बरं निसर्गाची काळजी घ्या तरंच निसर्ग तुमची काळजी घेईल..अन्यथा असही कलियुगाचा शेवट अटळ आहे! पृथ्वीतलावर आपण एकटेच सजीव नाही आहोत म्हणून जगा आणि जगू द्या!
                  ऋतुजा गुरव 🖋️🌸💟

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसं...

"Destiny "✨

Life ✨