"समाधान"

वेळ बदलते..गोष्टी बदलतात.. माणसं बदलतात आणखी पुढे जाऊन भावना सुध्दा बदलतात असं मी ऐकलंय. कोणी नास्तिक असतो तर कोणी अस्तिक पण देव मात्र कोणीच पाहिला नाहीये,मग जर असं असेल तर आयुष्यात नेमकं शाश्वत काय आहे? कधी विचार केला आहे का? कोणती गोष्ट आपल्याला उद्याच्या चिंतेमध्ये टाकते ? मग जगण्याची ही धावपळ कशासाठी असते? येणारा दिवस कोणीच पाहिला नाहीये मग तरी पण येणार्या वेळेची एवढी काळजी का? मग ही आयुष्य नावाची कसरत नेमकी कशासाठी आहे?
            माझ्या भाषेत बोलायचं झालं तर आयुष्य म्हणजे निव्वळ अस्तित्त्वाची लढाई आहे जी जन्मतः सुरू होते आणि मृत्यू जवळ जाऊन संपते! कारण जन्म आणि मृत्यू सोडलं तर या जगात शाश्वत असं काहीच नाही! जन्मतः प्रत्येक जण आपलं वेगळं अस्तित्व घेऊन येतो.. आणि फक्त ते टिकवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहतो. खरंच हे सगळं एवढं खोल असतं का? तुमच्या मनात नाही येत का कधी असे विचार? मला तर पडतात प्रश्र्न,मी शोधते उत्तरं !! खरंतर केला पाहिजे हा विचार.. थांबलं पाहिजे थोडं.. नाहीतर धावण्याच्या नादी लागलो तर घोड्याप्रमाणे फक्त डेस्टिनेशनच दिसेल.. आणि आयुष्य ही काही काॅम्पिटिशन नाहीये की जी कोणापासून जिंकायचीय.. इथे आपण स्वतःच स्वतःचा स्पर्धक आहे.. त्यामुळे घाई कसली आहे ? जर्नीचा फील घ्या.. आपण नक्की कुठे चाललो आहे याचा आढावा घ्या. स्वतःला काय हवंय याचा विचार करा.नाहीतर पूर्ण आयुष्य फक्त धावण्यात निघून जाईल आणि परिणामतः जर्नी बोअर होऊन जाईल!!
            असं म्हंटलं जात "बालपणीचा काळ सुखाचा" ते काही खोटं नाहीये ! बालपणीची ती निरागसता जपता आली पाहिजे.. तो निखळ आनंद टिकवता आला पाहिजे! आणि त्यासाठी गरजेचं आहे मनाला निरागस,निस्वार्थ आणि निष्पाप ठेऊन जगणं. शेवटी एक गोष्ट मला ही माहिती आहे मी जसं सांगतेय तितकं सोपं नाहिये जगणं..पण एवढं अवघड पण नाहिये! तुम्ही स्वप्नं बाळगा..त्यांचा पाठलाग करा..कष्ट करा त्या गोष्टी करावाच्या लागतात अन्यथा फक्त खाऊन आराम करून आयुष्याचा आनंद घेत राहणं हे काही प्रॅक्टिकल जगणं नाहिये ! पण जी काही लाईफ तुम्ही जगता त्यात फक्त पैसा.. संपत्ती आणि आनंदाच्या मागे लागू नका "समाधान" कुठे आहे ते शोधा. जर ते नसेल तर तुमचं यश आणि आनंद यांचा काहीच उपयोग नाही..एकदा समाधान कुठे आहे समजलं ना मग कोणतीच चिंता मनाला भेडसावत नाही किंवा चाळीशीतच हायपर टेन्शनच भूत मानगुटीवर बसत नाही! हसत रहा..आनंदी रहा.. मी तर तशीच जगते ; जगाचा विचार न करता!🖤
                   -ऋतुजा गुरव
              

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसं...

"Destiny "✨

Life ✨