माणसं...

                     माणसं....

रस्त्यावर न कळत स्मितहास्य करणारी माणसं,
काही गर्दीतल्या कोलहलात एकमेकाला चिरडणारी माणसं,
भावनांना गिळंकृत करुन वावरणारी माणसं,
काही त्याच भावनांना आर्ततेने जपणारी माणसं,
दुसर्यांच्या आयुष्यात डोकावणारी माणसं,
काही स्वत:च्याच जगात रमणारी माणसं,
छोट्याशाच अपेक्षांसोबत समाधानी माणसं,
काही सगळं काही असूनही विव्हळणारी माणसं,
मनात घर करून राहणारी माणसं,
काही हृदयात पोकळी ठेवून जाणारी माणसं,
स्वछंद.. मनसोक्त.. बिनधास्त जगणारी माणसं,
काही रोज स्वत:च मन मारून जगणारी माणसं,
गर्दीत खळखळून हसणारी माणसं,
एकांतात नकळत अश्रू ढाळणारी माणसं,
आयुष्यावर प्रेम करणारी माणसं,
नशिबाला दोष देणारी माणसं,
छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणारी माणसं,
प्रत्येक गोष्टीवर स्वत:च्या अपयशाच खापर फोडणारी माणसं,
पहावं तिकडे दिसणारी माणसं,
कधी असून सुद्धा नसणारी माणसं..
खरंच किती ती माणसं..किती ते चेहरे..किती ते मुखवटे..किती ते रंग..
शरिर जरी सारखं असलं तरी इथे माणसामाणसात भेद आहे..‌
.
.
.
.
.
.आणि आपण म्हणतो सगळी माणसं सारखीच असतात..
खरंच का हो,असतात का ही माणसं एकसारखी?

Comments

  1. माणसानं माणसात राहून माणसातल्या माणसाला माणुसकीच्या नजरेने माणूस म्हणून पाहिलं की सारी माणसं एकसारखीच दिसतात...😅🤗

    ReplyDelete
  2. माणसानं माणसात राहून माणसातल्या माणसाला माणुसकीच्या नजरेनं पाहिलं की सारी माणसं एकसारखीच दिसतात...😅🤗

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"Destiny "✨

Life ✨