मनातलं आणि मनापासून...❤️
लिहायचं तर आहे..पण नेहमी प्रश्र्न पडतो नक्की लिहायचं तरी काय? तसं एकदा सुरू केल्यानंतर सुचत जातं खूप काही पण सुरूवात करणे हेच एक युद्ध पातळीवरील काम असतं.. हां म्हणजे, सुरुवात करण्यापूर्वीच नक्की लिहायचं काय यावरून विचारांमध्ये बेफाम युद्ध सुरू झालेलं असतं..
पण आज मात्र आपोआप कोणतेतरी शब्द मनामध्ये गोंगाट करत होते..मग त्यांना कागदावर उतरवणं अनिवार्य होतं..नाहीतर आता पर्यंत त्या घोंघावणार्या विचारांनी डोक्याचा पार भुगा केला असता...
मग केली सुरूवात.. मला लिहायच होतं एका अशा गोष्टीवर जी आयुष्याच्या पडत्या काळात आपल्याला उभारी देते..ती गोष्ट माणसं, पैसा, संपत्ती यांच्या पलिकडे आहे.. जणू अदृश्य!! पण तरीही अदृश्य राहूनही तीचं पाठबळ खूप मोलाचं असतं!!तिचा पडत्याला आधार असतो.. खचलेल्याला धीर असतो.. जेव्हा सगळं काही संपल्यासारख वाटू लागतं तेव्हा एक आशेचा किरण असतो,जो हुलकावणी देत असतो.. "नाही, अजूनही काहीही होऊ शकतं.. इतक्यात सगळं संपू शकत नाही..इतक्यात मी हारु शकत नाही!" जग त्याला Positive attitude म्हणतं..मी त्याला "विश्र्वास" म्हणेन!
Positive विचार करायलासुध्दा कुठेतरी विश्र्वास असावा लागतो.. त्यामुळे फक्त positive thinking ला आपण सर्वस्वी कर्ता-धर्ता नाही म्हणू शकत ना? कारण चांगले संकेत (Good vibes) मिळायला ही कुठेतरी विश्र्वास असावा लागतो! मग तो स्वत:वर असेल तर आत्मविश्वास बनतो.. देवावर असेल तर ती श्रध्दा बनते आणि जर आजूबाजूच्या लोकांवर असेल तर ते सामर्थ्य आणि पाठबळ बनतो! नावं आणि रुपे कितीही असू देत त्याच काम मात्र एकच आहे आधार देणं!
असा कुठलाच माणूस नसेल ज्याचा कुठेच विश्र्वास नाही कारण विश्र्वासाशिवाय जगणं असूच शकत नाही!! हां हे मी मान्य करते की काही असतील ज्यांचा देवावर विश्वास नसेलही आणि काहींचा असेलही पण देवावर विश्वास नाही म्हणजे कुठेच नसेल असही नाही.. आस्तिकता आणि नास्तिकता यांच्या मध्ये जर कोणी नसेल तर तो "वास्तविकतेमध्ये" नक्कीच असतो!! एकूण विषय तिथेच येतो कुठेतरी विश्र्वास असल्याशिवाय आयुष्याची गाडी पुढे जाणे नाही!! खरंच किती भारी आहे ना ही कल्पना? मी तर विश्वासाशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही!! एव्हना तुम्ही पण विचार करू लागला असाल ना?काही चेहरेही समोर आले असतील जिथे तुमची श्रद्धा आहे सामर्थ्य आहे. पण एक सांगू? विश्र्वास जर देवावर ठेवत असाल तर पूर्ण ठेवा आणि माणसांवर ठेवत असाल तर अर्ध्यात ठेवू नका.. एकूणच जिथे ठेवाल तिथे पूर्णपणे ठेवा कारण जिथे विश्र्वास आहे तिथे पावित्र्य आहे!! आणि पावित्र्याची गणती कधी अर्धवट करता येत नाही..ते संपूर्ण असेल तरच त्याला पवित्र मानलं जातं!!
यापुढे जाऊन मला असं वाटतं की माणसाला जर कोणत्याही चिंतेशिवाय समाधानी राहून जगायचं असेल ना तर कुठेतरी विश्र्वास हा ठेवावाच!! देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही ना? मग राहू दे देवावर ठेवायचा.. आजूबाजूच्या लोकांवरही विश्र्वास नसेल ना तर त्यांच्यावरही नाही ठेवला तरी चालेल पण स्वत:वर नक्की ठेवा!! कारण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वत:च स्वत:साठी उभा रहावं लागतं! म्हणून आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाही.. कितीही कठिण परिस्थिती आली.. कितीही असह्य वाटू लागलं तरी सुद्धा मार्ग सापडतो..जर विश्र्वास ठेवला तर!! आयुष्य खूप छान आहे..फक्त येणार्या vibes(चांगल्या/वाईट दोन्ही) ओळखता आल्या पाहिजेत!!आणि विश्र्वास फक्त ठेवता आला म्हणजे झालं असही नाही..कोणी जर तोच विश्र्वास आपल्यावर ठेवत असेल तर तो टिकवताही आला पाहिजे.. बसं!! बाकी काय? जे करू ते मनापासून full dedication ने करायचं पण हो..अर्ध्यात काहीच नाही!
#Trust_vibes💫 #beleive_yourself 💌#spread_love !!❤️
Comments
Post a Comment